
गंगा नदीजवळील ‘मुनी की रेती’ भागात आंघोळीसाठी गेलेले तिघे जण बुडाले असून हे तिघेही मुंबईचे रहिवासी आहेत. यात दोघा तरुणींचा समावेश आहे. या तिघांचाही शोध एसडीआरएफ आणि पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबईहून पर्यटनासाठी आलेले मेलरॉय डांटे, अपूर्वा केळकर आणि मधुश्री खुरसांगे हे तिघेही ऋषिकेश येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हे तिघे आणि त्यांच्याबरोबर दोघे स्थानिक निकासी लक्ष्मणझुला रोड तपोवनजवळ आले. त्यावेळी मेलरॉय, अपूर्वा आणि मधुश्री पाण्यात आंघोळीसाठी उतरले असता त्यातील अपूर्वाचा पाय घसरून ती खोल पाण्यात मुख्य प्रवाहात पडली.
पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे ती प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागली. तिला वाचवण्यासाठी मेलरॉय आणि मधुश्री यांनी प्रयत्न केले असता तेही मुख्य प्रवाहात पडले आणि वेगवान प्रवाहामुळे वाहत गेले.

























































