पेगॅसस हेरगिरी प्रकरण गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायली स्पायवेअर पेगॅससच्या माध्यमातून झालेल्या हेरगिरीसंदर्भातील बातम्या खऱया असतील तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आरोपांमागील नेमके सत्य पुढे यायला हवे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले. तसेच सर्व याचिकाकर्त्यांना आपापल्या याचिकांच्या प्रती केंद्र सरकारला पाठवण्याचे निर्देश दिले. याप्रकरणी मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे.

सरकारला आमच्यासमोर येऊ दे, मग पुढचे बघू!

या प्रकरणातील सत्य समोर यायलाच हवे. यात कोणाकोणाची नावे आहेत हे आम्हाला ठाऊक नाही. याचिकाकर्त्यांनी आपापल्या याचिकांच्या प्रती केंद्र सरकारला पाठवाव्यात. आम्ही बजावलेली नोटीस स्वीकारण्यासाठी आमच्यासमोर सरकारतर्फे कोणीतरी हजर राहू दे, मग आम्ही पुढचे बघू, असे स्पष्ट करीत खंडपीठाने पुढील सुनावणीवेळी सरकारच्या हजेरीची अपेक्षा व्यक्त केली. या प्रकरणात विदेशी कंपन्याही आहेत. हे एक जटील प्रकरण आहे, असेही खंडपीठ म्हणाले.