देवबाग समुद्रकिनारी सापडली देवमाश्याची मौल्यवान उलटी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी सकाळी देवबाग समुद्रकिनारी फ्रान्सिस जॉन फर्नांडिस आणि किस्तु लुद्रीक या मच्छीमारांना मौल्यवान असा ‘अंबरग्रीस’ हा देवमाशाच्या (व्हेल मासा) उलटीसदृश अत्यंत सुवासिक व मौल्यवान पदार्थ सापडून आला.

पीठासारखा चिकट असलेला हा पदार्थ सुमारे दहा किलो वजनाचा आहे. मच्छीमारांनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने हा पदार्थ ताब्यात घेतला आहे. पुढील तपासणीसाठी कोलकता येथील तपासणी प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे. अशी माहिती वन अधिकारी यांनी दिली आहे.