निर्बंध शिथिल, जबाबदारी वाढली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सावधगिरीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्बंध शिथिल केले तरी तिसऱया लाटेचा धोका आणि विषाणूच्या बदलत्या अवतारापासून सावध राहिलेच पाहिजे. दुसऱया लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे कसे आव्हान उभे ठाकले आहे ते अजून ताजे आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. म्हणूनच यावेळी राज्यात निर्बंध लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे, असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोविड रुग्णांची संख्या घटली असली तरी मागील अनुभव लक्षात घेऊन सर्वांनीच अतिशय काळजी घेऊन वागायचे आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई आपण एकत्र मिळून लढतो आहोत. शासनाने दिलेल्या सूचना या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन आपण सहकार्य कराल.

काळजीपूर्वक निर्णय घेणार

मी परत सांगतो, निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नाही. परवा आपण मर्यादित प्रमाणात लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील हॉटेल उपाहारगृहे, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतले. इतरही  क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे, यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.