लोकसभेचे कामकाज गुंडाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका जड जातील, म्हणून पेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 127 वे घटनादुरुस्ती विधेयक आणून अनेक जातींना आरक्षणाचा लॉलिपॉप दाखविला आहे. हा राजकीय  हेतू साध्य झाल्यानंतर म्हणजेच लोकसभेने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आज लगेचच लोकसभेचे कामकाज नियोजित वेळापत्रकापूर्वीच गुंडाळण्यात आले. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात निव्वळ गोंधळच झाल्यामुळे या प्रकाराबद्दल लोकसभा अध्यक्ष व राज्यसभेच्या सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मी रात्रभर झोपू शकलो नाही, व्यंकय्या नायडू भावविवश

राज्यसभेत काल  विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभा महासचिवांच्या टेबलवर उभे राहून सुमारे दीड तास गदारोळ केला. यामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आज कमालीचे अस्वस्थ झाले. आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच नायडू  आसनावरून उठले आणि त्यांनी काल जे सभागृहात घडले ते अत्यंत क्लेशदायक होते. मी त्यामुळे रात्रभर झोपू शकलो नाही. संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे. तिचे पावित्र्य राखायला हवे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.