
कोरोनाकाळात महागाईने सर्वजण बेजार असताना आता विमान प्रवास करणाऱयांच्या खिशाला चांगलीच चाट पडणार आहे. कारण नागरी विमान मंत्रालयाने विमान भाडय़ाच्या किमान आणि कमाल सीमेच्या मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे विमान पंपन्यांना भाडेवाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. विमान भाडय़ात आता कमीत कमी दहा टक्के आणि जास्तीत जास्त 13 टक्के भाडेवाढ होणार आहे.
कोरोनाच्या लाटेमुळे देशभरातील लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी विमान प्रवासावर मर्यादा आल्याने सरकारने विमान प्रवासाच्या भाडय़ाची एक सीमा ठरवून दिली होती. फ्लाईटची संख्या घटल्याने सरकारने तसे केले होते. त्यामुळे विमान पंपन्या तिकिटांसाठी जास्त भाडे वसूल करीत होत्या. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने विमान प्रवाशांची संख्या वाढत असून अशात सरकारने भाडय़ाची सीमा वाढविली आहे. सरकारने किमान भाडय़ात 9.83 टक्के वाढ करण्याचा फैसला केला आहे. तर कमाल भाडे 12.82 टक्के वाढविले आहे. विमान मंत्रालयाने गुरुवारी रात्री हा आदेश जारी केला आहे.
40 मिनिटांच्या प्रवासास 2900 रुपये भाडे
नव्या नियमांप्रमाणे 40 मिनिटांच्या विमान प्रवासासाठी आता किमान भाडे 2,900 इतके असेल. यापूर्वी ते 2,600 इतके होते. याच कालावधीसाठी कमाल भाडे आता 8,800 रुपये असेल. पहिले ते 7,700 रुपये इतके होते. याच धर्तीवर 40 ते 60 मिनिटांच्या फ्लाईटसाठी किमान भाडे 3,700 रु. द्यावे लागेल. पूर्वी हे भाडे 3,300 रु. इतके होते. तर कमाल भाडे आता 11,000 इतके असेल. पूर्वी कमाल भाडे 9,500 इतके होते. एक तासांच्या फ्लाईटसाठी किमान भाडे आता 4,500 इतके असेल. यात 12.5 टक्के वाढ झाली आहे. याचे कमाल भाडे आता 13,200 रु. इतके असणार आहे. यातही 12.82 टक्के वाढ झाली आहे. दीड तासाच्या 120-150 मिनिटांच्या फ्लाईटसाठी किमान भाडे 6,100च्या जागी 6,700 रु. होईल. 150 ते 180 मिनिटांसाठी किमान भाडे 7,400 च्या जागी आता 8,300 आणि 180 ते 210 मिनिटांसाठी 8,700 च्या जागी 9,800 भाडे असणार आहे.


























































