‘डेल्टा’चे आणखी11 रुग्ण, महाराष्ट्राला टेन्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरू लागलेली असतानाच डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने टेंशन वाढले आहे. डेल्टा प्लसचे आणखी 11 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आता राज्यभरातील एकूण रुग्णसंख्या 77 झाली आहे.

इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेने राज्यात आणखी 11 डेल्टा प्लस रुग्णांचे निदान केले आहे. कोल्हापूर 7, रत्नागिरी 3 तर सिंधुदुर्ग 1 असे दहा नवे रुग्ण आतापर्यंत आढळून आले. डेल्टा प्लसची लागण झालेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे पाचही रुग्ण 65 वर्षांवरील होते आणि त्यांना अतिजोखमीचे आजार होते. या पाच जणांपैकी दोन जणांनी कोविशिल्ड लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या होत्या, तर दोघांनी कोणतीही लस घेतेलेली नव्हती, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.