
खोटं नाणं कधी कधी हुकमी ठरतं, असं म्हटलं जातं. असंच काहीसं एका नाण्याबद्दल झालंय. 50 पेंसचे एक नाणे ऑनलाईन लिलाव प्रक्रियेत तब्बल 37 हजार 50 रुपयांना विकले गेले आहे. 2012 च्या ऑलिम्पिक थीमवर एक खास नाणं तयार केले गेले होते. पण त्या नाण्यात काहीतरी कमतरता राहिली होती. त्यामुळे गेल्या आठवडय़ात ईबे या वेबसाईटवर ऑनलाईन लिलाव करण्यात आला. यावेळी अनेकांनी बोली लावली. 360 पाऊंडमध्ये विकले गेलेले नाणे ऑलिंम्पिकच्या दृष्टीने तयार करण्यात आले होते. यासाठी एकूण 29 डिझाईन तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच हे एक नाणे आहे. डिझाईनमध्ये काही रेषा चुकल्या होत्या. त्यामुळे हे नाणे नाकारण्यात आले होते.


























































