Google Play Store वरून हटवले नऊ धोकादायक अॅप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्ले स्टोअरवरील नऊ धोकादायक अॅप्सला गुगलने नुकताच बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या अॅपमुळे फोनमधील सॉफ्टवेअरला धोका निर्माण होऊ शकतो किंवा फेसबुक अकाऊंट हायजॅक करू शकते. त्यामुळे हे अॅप हटवण्यात आले आहेत. जीजी वाऊचर, वोट यूरोपियन फुटबॉल, जीजी कूपन ऍडस्, जीजी व्हाऊचर ऍडस्, com.free.voucher, चॅट फ्यूल, नेट कूपन, com.movie.net_coupon, युरो 2021 ऑफिशियल अशी हटवण्यात आलेल्या अॅप्सची नावे आहेत. हे अॅप्स चुकून तुमच्या स्मार्टफोनमध्ये असतील तर ते तत्काळ डिलीट करा.

फ्लायट्रप जगभरात वेगाने पसरतोय

zimperium च्या तज्ञांनी फ्लायट्रप नावाच्या प्रोग्रामची ओळख केली आहे. हे फेसबुक अकाऊंटला हायजॅक करू शकतात. हॅकर्स फेसबुक अकाऊंटला कंट्रोल करून ई-मेल आणि कुकीजला ऍक्सेस करू शकतात.