
आज 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्र दिवस. यानिमित्ताने इन्स्टाग्रामवर सर्वाधिक आवडत्या फोटोची चर्चा रंगली आहे. हा फोटो आहे एका अंडय़ाचा. पिवळसर रंगाचे कोंबडीचे अंडे… अंडय़ाने तर भलभल्या सेलिब्रेटींना मागे टाकून चक्क लाइक्सचा रेकॉर्ड केला आहे. ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’ या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून अंडय़ाचा पहिला फोटो शेअर करण्यात आला. त्यावर कॅप्शन दिलेय की, ‘चला विश्वविक्रम करूया. इन्स्टाग्रामवर सर्वात आवडलेली पोस्ट बनवूया. काईली जेनरचा 1.8 कोटी लाइक्सचा विक्रम तोडूया.’
सध्या अंडय़ाच्या फोटोला 5.5 कोटींपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. अन्य कोणताही सेलिब्रेटी अद्याप त्याच्याजवळ पोहचलेला नाही.
























































