शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम कॉलेजांचेच, ‘यूजीसी’ने केले स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवी आणि अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम विद्यापीठे आणि महाविद्यालयांचेच आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) स्पष्ट केले आहे. प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासंदर्भात अनेक विद्यार्थी यूजीसीला विनंती करत असतात. त्यामुळे यूजीसीने ते काम आपले नसल्याचे सांगितले आहे.

‘यूजीसी’ ही केवळ महाविद्यालयांना मान्यता देते. त्यामुळे महाविद्यालयांनी ‘यूजीसी’च्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया शैक्षणिक प्रमाणपत्रांची सत्यासत्यता तपासणे हासुद्धा त्या नियमाचाच भाग आहे असे ‘यूजीसी’ने म्हटले आहे. यूजीसी मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांना नोकरीच्या वेळी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या पडताळणीचीही गरज पडत नाही.