यंदा मतदानाचा जागर, ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ संकल्पना राबविणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
voting

मुंबईत यंदा गणेशोत्सवादरम्यान मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणशोत्सव मंडळे प्रयत्न करणार आहेत. आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकारांचा’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पुढाकाराने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मतदानासाठी हा जागार करणार आहेत. मतदानासाठी जनजागृती करताना आयोजित केल्या जाणाऱया उपक्रमांसाठी सार्वजनिक मंडळांकडून आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मतदारांमध्ये जनजागृती करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून त्यानंतर वरील निर्णय घेण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली, तर यासाठी समन्वय समितीच्या प्रतिनिधींची आणि निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची एक उपसमितीदेखील नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, गिरीश वालावलकर, शिवाजी खैरनार, ओंकार सावंत, निखिल गावंड, दिलीप बामाणे, भरत पोफळे, उमेश नाईक आदी उपस्थित होते.

  • यंदाच्या गणेशोत्सवात ‘मताधिकारी आणि लोकशाही’ या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार.
  • ‘मताधिकारी आणि लोकशाही’ या विषयावर पथनाटय़ांचे आयोजन करणार.
  • गणेशोत्सवासाठी 30 सेंकदांचा व्हिडीओ तयार करून ते सोशल माध्यमांवर प्रसारित करणार.
  • मतदारांना त्यांची नोंदणी करण्यासाठी ऑडिओ मंडपाच्या ठिकाणी ऐकविली जाणार.
  • मंडळाच्या प्रतिनिधींच्या टीशर्ट आणि मास्कवर ‘उत्सव गणेशाचा, जागर मताधिकाराचा’ ही टॅगलाइन असणार.
  • मतदार नावनोंदणीसाठी जाहिरात प्रसारित करणार.

यावर्षीही शिवाजी पार्क मंडळाचा उत्सव नाही

कोविडच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क येथील शिवाजी पार्क गणेश उत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्ते, भाविक व नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे मंडळाचे सरचिटणीस रमणी चंद्रन यांनी कळवले आहे. मागील वर्षीही कोरोनामुळे मंडळाने गणेशोत्सव साजरा केला नव्हता.

  • या डॉक्टरांकडे कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना नसून त्यांच्याकडे महाराष्ट्र मेडिकल काैन्सिलमध्ये नोंदणी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. हे बोगस डॉक्टर वैद्यकीय शिक्षण तर नाही पण फार शिकले नसल्याचा संशय असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. यापुढेदेखील बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.