सीनियर अन् स्टार कबड्डीपटू लिलावात, संघ मालकांचा युवा खेळाडूंकडे ओढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फटका इतर क्षेत्रांप्रमाणे कबड्डी या खेळालाही बसला आहे. मुंबईत 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत यंदाच्या प्रो-कबड्डी लीग या मोसमासाठी कबड्डीपटूंचा लिलाव करण्यात येणार आहे. याप्रसंगी 500च्यावर कबड्डीपटूंवर बोली लावण्यात येईल. कोरोनामुळे आर्थिक चणचण निर्माण झालेल्या संघ मालकांनी या वेळी सीनियर व स्टार कबड्डीपटूंना आपल्या संघात कायम न ठेवता बहुतांशी युवा खेळाडूंना ‘रिटेन’ अर्थातच कायम ठेवले आहे. प्रो-कबड्डी लीगमध्ये सहभागी होणाऱया 12 संघांकडून एकूण 59 कबड्डीपटू कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 22 एलिट कबड्डीपटूंचा समावेश आहे. सीनियर कबड्डीपटूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील यासाठी संघ मालकांनी हे पाऊल उचलले असावे.

या स्टार खेळाडूंवर लागणार बोली

प्रो-कबड्डी लीगच्या लिलावात मोठय़ा रकमेची बोली लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांशी सीनियर कबड्डीपटूंवर बोली लावण्यात येणार आहे. परदीप नरवाल, दीपक हुडा, राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई व रोहीत कुमार हे स्टार कबड्डीपटू लिलावात असणार आहेत. त्यामुळे यंदाच्या लिलावात आकर्षण असेल एवढं मात्र निश्चित आहे.

रिटेन करण्यात आलेले एलिट खेळाडू

n बंगाल वॉरियर्स – मनिंदर सिंग, मोहम्मद नबिबक्ष, रिंकू नरवाल
n बंगळुरू बुल्स -पवनकुमार सेहरावत, अमित शिओरॅन
n दबंग दिल्ली – विजय, नीरज नरवाल
n गुजरात जायंट्स – परवेश भैंसवाल, सुनीलकुमार
n हरयाणा स्टीलर्स – विकास खंडोला
n जयपूर पिंक पँथर्स – अमित हुडा, विशाल
n पटणा पायरेट्स – नीरजकुमार, मोनू
n पुणेरी पलटण – बाळासाहेब जाधव, पवनकुमार, हाडी ताजीक
n तेलुगू टायटन्स – राकेश गौडा
n यू मुंबा – फझल अत्राचली, अभिषेक सिंग, अजिंक्य कापरे, हरेंद्रकुमार