
गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करणाऱ्या सराईताला समर्थ पोलिसांनी अटक केली. विनायक राजू पूजारी (वय 27 रा. घोरपडीगांव ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि आरटीओ नंबरच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात आला.
फसवणूकीच्या गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या रणजित बबन खेडेकर (वय 35 रा. ऊरुळी कांचन) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, यांच्या मार्गदर्शनानुसार एपीआय संदीप जोरे, सतिश भालेराव, सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुमित खुट्टे, सुभाष मोरे, निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव, रिकी भिसे यांनी केली आहे.






























































