
आपल्या शरीरावर जसा विषाणूंचा हल्ला होऊ शकतो, तसंच त्याला रोखण्यासाठी काही जिवाणूंची योजनाही निसर्गाने केलेली आहे. अशाच प्रकारचे काही जीवाणू सध्या कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहेत. एका वैद्यकीय संशोधनात ही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे.
हे संशोधन पुण्यातील नॅशनल सेंटर ऑफ सेल सायन्स आणि बीजे वैद्यकीय महाविद्यालयाने संयुक्तरित्या केलं आहे. या संशोधनात हा महत्त्वाचा शोध लागल्याचा
नाकातील चांगले जीवाणू कोरोनाला गंभीर स्वरूप धारण करू देत नाहीत, असा शोध या संशोधनातून लागला आहे. कोरोनाची लागण झालेल्या काही रुग्णांना त्याची लक्षणे अजिबात दिसून येत नाहीत, त्याचं कारणंही हे जीवाणू आहेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
नाकातील चांगले जीवाणू कोरोनाच्या विषाणूंवर प्रभाव टाकतात. त्यामुळे कोरोनाचे विषाणू जास्त नुकसान करू शकत नाहीत. तसंच या आजाराची पातळीही गंभीर होण्यापासून हे जीवाणू रोखतात, असं या संशोधनातून समजल्याचंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
































































