
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना घेऊन पोलीस पावणेदहा वाजता न्यायालयात पोहोचले. त्यानंतर तब्बल एक तास या प्रकरणाची सुनावणी झाली. यादरम्यान कोर्टाबाहेर उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. भाजपचे कार्यकर्ते फुल टेन्शनमध्ये होते. न्यायमूर्ती आपला निकाल काय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
संगमेश्वर येथून पोलिसांचा फौजफाटा राणे यांना घेऊन रात्री पावणेनऊ वाजता महाड येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे कोकण परिक्षेत्र महानिरीक्षक संजय मोहिते, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सरकारी डॉक्टरांनी राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यानंतर रात्री 9.30 वाजता राणे यांना घेऊन पोलीस प्रथम न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयाकडे घेऊन निघाले. पावणेदहा वाजता राणे यांना घेऊन पोलीस न्यायालयात पोहोचले.
- प्रथम न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर रात्री 10.50 वाजता आपला निकाल दिला. राणेंना पोलीस कोठडीची गरज नाही म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात येत आहे, असा निकाल न्यायदंडाधिकाऱयांनी दिला. त्यानंतर राणेंच्या वकिलांनी तत्काळ त्यांच्या जामीनाचा अर्ज दिला. या जामीन अर्जावर नंतर तब्बल अर्धा तास सुनावणी झाली आणि राणेंना मोठय़ा धाकधुकीनंतर न्यायदंडाधिकारी बाबासाहेब पाटील यांनी जामीन मंजूर केला. सगळय़ा प्रक्रिया पूर्ण करून राणे यांना कोर्टाबाहेर पडण्यास रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते.































































