सलग 32 तास सतारवादन! दिल्लीच्या शिक्षकाचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग 32 तास सतारवादन करून दिल्लीच्या शिक्षकाने विश्वविक्रम केला आहे. राजकुमार असे या शिक्षकांचे नाव आहे. याबद्दल राजकुमार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी द्वारका सेक्टर 19 येथील स्कूल ऑफ स्पेशलाईज्ड एज्युकेशनच्या हॉलमध्ये 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता सतार वादनाला सुरुवात केली होती. यावेळी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

नियमानुसार राजकुमार यांना 45 मिनिटांचा ब्रेक देण्यात आला. याआधी सलग 29 तास आठ मिनिटे 35 सेकंदापर्यंत सतारवादन करण्याचा रेकॉर्ड राधाकृष्णन मनोहरन यांच्या नावावर आहे. तो राजकुमार यांनी तोडला आहे.  गिनीज बुक ऑफ रेकॉर्डचा दावा करत राजकुमार म्हणाले, खूप दिवसांपासून या क्षणांची वाट बघत होतो. गिनीज रेकॉर्डसाठी व्हिडीयो, साक्षी-पुरावे पाठवणार आहे.