
मातीपासून तयार केलेली भांडी पर्यावरणाच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळेच मातीच्या भांडय़ांना मागणी वाढली आहे. कुल्हडमध्ये चहा, लस्सी देण्यापासून लग्नसमारंभात मातीच्या भांडय़ामध्ये जेवण वाढले जात आहे. भोपाळच्या क्षितिज जैनने पाच वर्षांपूर्वी मातीच्या भांडय़ांचे मार्पेटिंग सुरू केले. सध्या हा व्यवसाय देशभरात पोचला असून 150 हून अधिक स्थानिक कारगिरांचे नेटवर्प तयार झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात या कारागिरांनी लाखोंची उलाढाल केली आहे.
23 वर्षांच्या क्षितिजने इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले आहे. इंजिनीयरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना त्याने ट्रडिशनल हब नावाचा स्टार्टअप सुरू केला. त्यासाठी मातीची भांडी बनवणाऱया लोकांना तो भेटला. त्यांच्याशी हातमिळवणी करत सोशल मीडियावरून त्यांच्या उत्पादनांचे मार्पेटिंग करायला सुरुवात केली. सुरुवातील कुल्हडचे मार्केटिंग केले. त्यानंतर मातीपासून कढई, थाळी यांसारख्या वस्तू बनवायला सुरुवात केली. क्षितिजने साधारण दीड लाख रुपये भांडवल उभे केले. हळूहळू त्यांनी भोपाळच्या बाहेर मार्पेटिंग सुरू केले. त्यामुळे क्षितिजच्या स्टार्टअपशी देशभरातील अनेक कुंभार जोडले गेले.
क्षितिज सांगतो, कारागिरांकडून आम्ही मागणीनुसार भांडी बनवून घेतो. भांडय़ांची गुणवत्ता तपासल्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीला ठेवतो. ऑर्डर लहान असेल तर आम्ही थेट ग्राहकांना कुरियरने भांडी पाठवतो. ऑर्डर मोठी असेल तर ग्राहकांना आधी सॅम्पल पाठवतो. लॉकडाऊनच्या आधी दिवसाला 10 ते 12 ऑर्डर यायच्या. मात्र आता त्यामध्ये थोडी घट झाल्याचे क्षितिजने सांगितले.

























































