फेसबुकवरून ऑडियो- व्हिडियो कॉल करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या काळात फेसबुकच्या अॅपवरून युजर्सला व्हॉईस आणि व्हिडियो कॉल करता येणे शक्य होईल. याबाबतची चाचणी सध्या सुरू आहे. सध्या व्हॉईस आणि व्हिडियो कॉलसाठी फेसबुक मॅसेंजर अॅपचा वापर करावा लागतो.

फेसबुकने 2014 मध्ये अधिकृतरित्या फेसबुक अॅपमधून हे फीचर हटवले होते. आता पुन्हा हे फेसबुक मुख्य अॅपमध्ये सुरू करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अनेक देशांमध्ये व्हिडियो आणि व्हॉईस कॉल फीचर चाचणी करत असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

कित्येकांनी आपल्या फोनमध्ये फेसबुक मॅसेंजर डाऊनलोड केलेले आहे. भविष्यात जर फेसबुकच्या मेन अॅपवरच व्हिडियो आणि व्हॉईस कॉल फीचर आल्यास मॅसेंजर हटवले जाईल की नाही, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.