भातखळकरांना कंटाळून भाजयुमोच्या उपाध्यक्षांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सत्ता गेल्यानंतर भाजपमध्ये माजलेले दुफळी आता सर्वांसमोर येऊ लागली आहे. पश्चिम उपनगरातील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापासून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर केलेल्या बेछूट आरोपांना कंटाळून भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

भाजयुमोचे उपाध्यक्ष आशुतोष ठाकर यांनी आमदार अतुल भातखळकर यांचे वक्तव्य आणि सामान्य कार्यकर्त्यासमोर पक्षश्रेष्ठीचा केलेला पाणउतारा याचा संपूर्ण तपशील या पत्रात नमूद केला आहे. भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना ते पत्र पाठवले आहे. काही दिवसांपूर्वी अतुल भातखळकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या भेटीत त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासमोर पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांपासून राज्यातील नेत्यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. पक्षाच्या नेत्यांबद्दल वापरलेल्या अभद्र शब्दांचा उल्लेखही करणे शक्य नाही असे पत्रात म्हटले आहे.