
तिसऱया लाटेचे संकेत मिळत असल्यामुळे सतर्प झालेल्या पालिकेने मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये 2 ते 6 टेस्टिंग सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईतील टेस्टिंग सेंटर्सची संख्या 266 होणार आहे. या सेंटर्सची यादीही पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. शिवाय प्रत्येक क्लोज काँटॅक्टमागे 15 ते 20 जणांचा शोध घेऊन चाचण्या करून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱया उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोरोना रुग्णांची संख्या रोखणे, अत्यवस्थ रुग्णांची संख्या रोखणे यासाठी ‘अर्ली टेस्टिंग, अर्ली ट्रिटिंग आणि अर्ली डिस्चार्ज’ अशी त्रिसूत्री अवलंबली जाणार असल्याचे काकाणी म्हणाले. कोरोना रुग्णसंख्या घटल्यामुळे दोन्ही लाटांमध्ये टेस्टिंग सेंटर विखुरली होती, मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोविड-19 विषाणूचा डेल्टा प्रकार आतापर्यंत हिंदुस्थानसह जगातील एपूण अकरा देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर फैलावला आहे. याचा परिणाम म्हणून संभाव्य तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती वैद्यकीय तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याची तयारी करताना टेस्टिंग सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय पालिपेने घेतला आहे. शिवाय कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना खबरदारी जबाबदारीने घ्यावी, असे आवाहनही काकाणी यांनी केले आहे. यामध्ये मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे आणि वारंवार सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अशी होणार सुविधा उपलब्ध
n पालिका कार्यक्षेत्रात सुमारे 250 ठिकाणी विनामूल्य आरटीपीसीआर आणि ऑण्टिजेन चाचणी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह, विभाग कार्यालये तसेच कोविड केंद्र या सर्वांचा समावेश आहे.
n सदर चाचणी केंद्रांची यादी पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच विभाग नियंत्रण कक्षांमध्येदेखील तपशील उपलब्ध आहे. त्याआधारे आपल्या घरानजीकचे विनामूल्य कोविड चाचणी केंद्र आणि त्यांची वेळ आदी माहिती नागरिक प्राप्त करू शकतात.
सहव्याधी असल्यास काळजी घ्या
दरम्यान, ज्या ज्येष्ठ नागरिकांना सहव्याधी आहेत (उदाहरणार्थ फुप्फुसांचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार, मधुमेह, मेंदूविकार, रक्तदाब) अशा नागरिकांस प्रसूती काळ नजीक असलेल्या गर्भवती माता, डायलिसिस रुग्ण, कर्प रुग्ण आदी जोखीम गटातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असेदेखील आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






















































