एक हजार मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
588 मंडळांचे अर्ज छाननी प्रक्रियेत 178 मंडळांना परवानगी नाकारली

सर्वांचा आवडता गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर आला असताना मुंबईत अर्ज केलेली अजूनही एक हजार मंडळे परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत सुमारे साडेनऊशे मंडळांना परवानगी देण्यात आली असून 178 मंडळांना विविध कारणांमुळे परवानगी नाकारण्यात आली आहे. तर 588 मंडळांचे अर्ज छाननी प्रक्रियेत आहेत.

सर्व गणेश मंडळांना पालिकेची परवानगी घेऊन उत्सव साजरा करावा लागतो. मंडळांना या वर्षी 21 जुलैपर्यंत ऑफलाइन परवानगी घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र त्यांची पसंती ऑनलाइन परवानगीला असल्याने आता फक्त ऑनलाइन परवानगीच दिली जात आहे. मंडळांना परवानगीसाठी 6 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर 7 आणि 8 तारीखला शेवटच्या टप्प्याच्या परवानग्या देण्यात येणार असल्याचे काळे यांनी सागितले. कोरोनामुळे या वर्षी मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.