रुपाली–चिन्मयचे ‘देवा गणराया’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. या आनंददायी वाताकरणात अधिकच भर टाकणारे ‘देवा गणराया’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.  चिन्मय उदगीरकर आणि रुपाली भोसले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या सुमधुर गाण्याला स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजाने चारचाँद लाकले आहेत.

संदीप माळकी यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून सुमन एन्टरटेन्मेंट आणि मीडिया प्रस्तुत या गाण्याचे संगीत चिनार-महेश यांनी केले आहे. या गाण्याची निर्मिती केदार जोशी यांची आहे. दिग्दर्शन आशीष नेवाळकर यांचे आहे.