
राजधानी एक्सप्रेसमध्ये आमदार अंतर्वस्त्रावर फिरत असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्हायरल फोटोमुळे वाद उफाळला असून या आमदारांनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारची राजधानी पाटणा इथल्या राजेंद्रनगर येथून नवी दिल्ली येथे तेजस राजधानी एक्सप्रेस जात होती. त्यात प्रवास करत असताना एका डब्यातील प्रवाशांना एक व्यक्ती अंतर्वस्त्रावर फिरत असल्याचं आढळलं. ती व्यक्ती त्यांची सहप्रवासी होती.
फक्त बनियन आणि अंडरवेअरवर हा प्रवासी ट्रेनच्या डब्यात फिरत होता. तो प्रवासी दुसरा तिसरा कुणी नसून बिहारचे जदयूचे आमदार गोपाल मंडल होते. त्यांच्या कपड्यांवर सहप्रवाशांनी आक्षेप घेतला.
तो आक्षेप पाहून मंडल यांना राग आला आणि त्यांनी सहप्रवाशांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. चालत्या ट्रेनमध्ये यामुळे बराच गदारोळ झाला.
मंडल यांचा याच कपड्यांमधला फोटोही व्हायरल झाला. त्यानंतर वादाला तोंड फुटलं. त्यावर मंडल यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, माझं पोट खराब झालं होतं. म्हणून मी असा फिरत होतो. मी जे बोलते ते खरं बोलतो, खोटं बोलत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
#WATCH I was only wearing the undergarments as my stomach was upset during the journey: Gopal Mandal, JDU MLA, who was seen in undergarments while travelling from Patna to New Delhi on Tejas Rajdhani Express train yesterday pic.twitter.com/VBOKMtkNTq
— ANI (@ANI) September 3, 2021


























































