
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात लंडनच्या ओव्हल मैदानात चौथा कसोटी सामना सुरू आहे. लॉर्डस आणि लीड्सप्रमाणे या कसोटीतही इंग्लंडचा एक व्यक्ती हिंदुस्थानकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला. या व्यक्तीचे नाव जार्वो असून तो लॉर्डस आणि लीड्समध्येही सामना सुरू असताना मैदानात घुसला होता.
चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उमेश यादव गोलंदाजी करत असताना जार्वो मैदानात आला. पळत आलेला जार्वो गोलंदाजी करू लागला. गोलंदाजीसाठी पळताना त्याने इंग्लंडचा फलंदाज ओली पोप यालाही टक्कर दिला. त्यला व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Jarvo again!!! Wants to bowl this time #jarvo69 #jarvo #ENGvIND #IndvsEng pic.twitter.com/wXcc5hOG9f
— Raghav Padia (@raghav_padia) September 3, 2021
आजीवन बंदी
दरम्यान, लीड्स कसोटीमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जार्वो पॅड बांधून, हेल्मेट घालून मैदानात उतरला होता. 69 नंबरची जर्सी घालून आलेल्या जार्वोला टीम इंडियाकडून फलंदाजी करायची होती. मात्र सुरक्षरक्षकांनी त्याला धक्के मारत बाहेर काढले. तसेच त्याच्या या कृतीबद्दल यॉर्कशायर काउंटीने हेडिंग्लेच्या मैदानावर येण्यास त्याला आजीवन बंदी घातली. तरीही त्याने पुन्हा एकदा ओव्हल मैदानात घुसून खेळ थांबवला.
How does he keep doing it?! His bowl was a chuck though #jarvo69 pic.twitter.com/nYbbgc3oII
— Huw Turbervill (@huwzat) September 3, 2021




























































