गोकुळधाम मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत प्रभाग क्रमांक 52 मधील गोकुळधाम साई मार्ग व कृष्ण वाटिका मार्ग येथे लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसकण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार रवींद्र वायकर यांनी दिली. त्याचबरोबर आरे वसाहतीतील गणेशभक्तांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी सूचनाही वायकर यांनी पालिका अधिकाऱयांना केली.

जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱया प्रभाग क्रमांक 52 व 53 मधील विविध प्रलंबित कामांबाबत वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या पी-दक्षिण किभागीय कार्यालयात संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला नगरसेविका रेखा रामवंशी, उपायुक्त मराठे, साहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे, आरे पोलीस ठाणे, वाहतूक विभागाचे अधिकारी, चित्रनगरी, आरे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नियोजन विभाग, जलविभाग, अदानी इलेक्ट्रिक सिटी, मलःनिस्सारण विभाग, म्हाडा विभागाचे अधिकारी, जोगेश्वरी महिला विधानसभा संघटक, महिला शाखा संघटक अपर्णा परळकर, पूजा शिंदे, शाखाप्रमुख बाळा ताकडे, संदीप गाढवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.