टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अजून एका सुवर्ण पदकाची कमाई, वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एका सुवर्ण पदकाची भर पडली आहे. रविवारी झालेल्या बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी एसएच6 स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत हिंदुस्थानच्या कृष्णा नागर याने सुवर्ण पदक मिळवलं आहे.

कृष्णा नागरने हाँगकाँगच्या के चू मान काई याचा 21-17, 16-21, 21-17 असा पराभव केला. अवघ्या 43 मिनिटात कृष्णाने हा इतिहास रचला आहे.

कृष्णाच्या विजयामुळे हिंदुस्थानच्या खात्यातील पदकसंख्या 19 झाली आहे. यात पाच सुवर्ण, आठ रौप्य तर सहा कांस्य पदकांचा समावेश आहे.

कृष्णाने मिळवलेलं सुवर्ण पदक हे हिंदुस्थानकडील पाचवं सुवर्ण पदक आहे. शनिवारी प्रमोद भगत याने चौथं सुवर्ण पदक मिळवलं होतं. तर त्यापूर्वी मनीष नरवाल, अवनी लखेरा आणि सुमित अंतिल यांनी सुवर्ण पदकं जिंकली आहेत.