कंडोम-गोळ्या नाही तर अँटिबॉडीज करणार गर्भनिरोधकाचं काम, वाचा बातमी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

गर्भनिरोधासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात त्यातील कोणताही पर्याय हा संपूर्णतः सुरक्षित मानला जात नाही. अनेक साधनांचे साईड इफेक्ट्स असल्यानेही महिला किंवा पुरुषांना त्यांचा वापर करण्याची भीती वाटते. पण, यावर शास्त्रज्ञांनी एक पर्याय शोधला आहे.

कोरोनाच्या उपचारांवर उपयुक्त असणाऱ्या मोनोक्लोनल अँटिबॉडीजचा वापर आता गर्भनिरोधासाठी होणार आहे. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीन आणि ईबीओमेडिसीन या वैद्यकीय अहवालांमध्ये या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

मोनोक्लोनल अँटिबॉडीज मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या माध्यमातून शुक्रजंतूंवर हल्ला करतात. ज्या प्रमाणे एखाद्या विषाणूवर हल्ला करून तो कमकुवत केला जातो, त्याच प्रकारे शुक्रजंतूंचा परिपक्व बीजासोबत संयोग होण्यापूर्वी मोनोक्लोनल अँटिबॉडीज त्यांच्यावर हल्ला करतात.

या अहवालात केलेल्या परीक्षणानुसार, स्त्रियांसाठीच्या कंडोमप्रमाणे या अँटिबॉडीज असलेला एक पातळ पडदा असं या गर्भनिरोधकाचं स्वरूप असणार आहे. या पडद्याचं परीक्षण काही स्वयंसेवक महिलांवरही करण्यात आलं असून हे परीक्षण यशस्वी ठरलं आहे.

आता पुरुषांसाठी अँटिबॉडीज जेल विकसित करण्यात येत आहे. हे जेल पुरुषांसाठी नसबंदी किंवा कंडोमपेक्षा प्रभावी ठरू शकतं, अशी आशाही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.