
गेवराई तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून गेवराई तालुक्यातील मारफळा,भेंड आणि जातेगाव येथील तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि तब्बल गेवराई तालुक्यात तीन तलाव फुटले आहेत.
गेवराई तालुक्यात गेल्या-चार दिवसापासून पावसाची संततधार असल्यामुळे तालुक्यातील पूर्ण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून ओसांडून वाहत आहेत. शेकटानंतर मंगळवार रोजी तीन तलाव फुटले त्यामध्ये मारफळा, जातेगाव ,भेंड या तलावाचा समावेश आहे. मनुष्यहानी झाली नसली तरी पिकाचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर मारफळा तलाव फुटल्यामुळे सुडी, चोपडयाची वाडी या व काही गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता गावकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
























































