
एका विवाहित शिक्षिकेने आपल्या 14 वर्षीय विद्यार्थ्यावर बलात्कार केला आहे. ही घटना अमेरिकेतील असून या प्रकरणी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे.
अमेरिकेत कॅलिफोर्निया शहरात क्रिस्टल जॅक्सन या 39 वर्षीय महिलेने एका अल्पवयीन विद्यार्थ्यांवर बलात्कार केला आहे. क्रिस्टल या विद्यार्थ्याची खासगी शिकवणी घ्यायची. त्या दरम्यान क्रिस्टलने विद्यार्थ्यांवर तीन वेळा बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी क्रिस्टलला अटक केली आहे. पीडित मुलगा सुरक्षित असून त्याचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच आरोपी क्रिस्टलने अजून किती विद्यार्थ्यांवर अत्याचार केले आहे याचा तपास पोलीस करत आहेत.






















































