
जगातील अग्रेसर ग्राहक आरोग्य आणि स्वच्छता कंपनी रेकिटने तिची भागीदार जागरन पेहेल यांसोबत 5 नवीन भारताच्या राज्यांमध्ये हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजची स्थापना केली, त्यामध्ये आधीपासूनच सेंटर असलेल्या महाराष्ट्रामधील संभाजीनगर सोबतच आता पंजाब, उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू, आणि आंध्रप्रदेश यांचा समावेश आहे.
या विस्ताराच्या माध्यमातून, 1 वर्षामध्ये 7000 स्वच्छता कामगारांना प्रतिष्ठित आणि निरोगी जीवन देण्यासाठी सक्षम बनवणे हा कॉलेजचा उद्देश्य आहे. त्यांना कॉलेज मध्ये दिले जाणारे प्रशिक्षण योग्य ज्ञान आणि कौशल्याचे असते, त्यांना मशीनचा वापर, बचावात्मक योजना, त्यांचे अधिकार आणि हक्क समजून घेणे यावर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते ज्यामुळे त्यांना प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध जागतीक, राष्ट्रीय आणि स्थानिक संघटनांमध्ये सुरक्षित नोकरी मिळू शकते. उपक्रमाचा भाग म्हणून, कॉलेज 50 स्व सहाय्य गटांना सुद्धा मदत देणार आहे जे जागरूकता पसरविण्यामध्ये काम करतील. हे गट मायक्रो फायनांस इंस्टीट्युशन सोबत जुळले जातील आणि त्यांच्यासाठी शक्य सहाय्यक मॉडेलसाठी योजनात्मक सहाय्य देतील.
हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजचा मुख्य हेतू हा स्वच्छता कर्मचाऱ्यांना बळकट आणि सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट नंतरचे सहाय्य यामाध्यमातून पर्यायी जीवनासाठी संधी देऊन प्रतिष्ठित जीवन देणे हा आहे.
आर्थिक, सामाजिक आणि आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असलेल्या स्वच्छता कामगारांना सुरक्षा आणि बढावा देणे हे फार आवश्यक आहे. डालबर्गने दिलेल्या ‘देशातील स्वच्छता कामगारांची सुरक्षा आणि जीवनदर्जा’ या अहवालाप्रमाणे, देशामध्ये असे पूर्ण वेळ काम करणारे 5 दशलक्ष (अंदाजे) स्वच्छता कामगार आहेत, ज्यांना जोखिम आणि प्रतिष्ठा यांचा धोका असतो. यांपैकी 1 दशलक्ष लोक शहरी भागातील असून ते नाल्या आणि समाजातील काही भाग स्वच्छ करतात आणि 600 हजार लोक शौचालय स्वच्छतेमध्ये गुंतलेले असतात.
देशातील सध्याची स्वच्छता संरचना नियमीतपणे कामगारांना धोकादायक स्थितीत ढकलते, उपकरणे आणि गियर असुरक्षित स्थितीमधून पूर्णपणे जोखिम कमी करत नाहीत. कोविड महामारीमध्ये हे धोके वाढले आहेत, संरक्षणात्मक उपकरणांच्या अभावामुळे आणि औपचारिक प्रशिक्षणामुळे कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो आहे विशेष करून जेव्हा ते हॉट स्पॉट निर्जंतुक करणे, कोविड असलेले मृतदेह घेऊन जाणे, आणि संसर्ग असलेला जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे यांसारखी अतिरिक्त कामे करत असतात. सातत्याने वेळी-अवेळी लोकांमध्ये काम करणे आणि आलेल्या अडचणींची तक्रार करण्याची सोय नसल्यामुळे महिला स्वच्छता कामगारांना असुरक्षित वातावरणाला तोंड द्यावे लागते.
5 राज्यांमध्ये चालू झालेला हा डिजिटल प्रशिक्षण अभ्यासक्रम 5 प्रादेशिक भाषांमध्ये केला जाईल आणि आधीचा अभ्यासक्रम सुद्धा ऑडियो-आधारित अभ्यासामध्ये सुधारला जाईल, ज्यामुळे तो स्वच्छता कामगारांना शिकण्यास आणि आत्मसात करण्यास सोपा जाईल. हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज संभाजीनगर, रेकिटच्या सहकार्याने जागरन पेहेल आणि प्रमुख भागीदारांचे ध्येय या उपक्रमाच्या माध्यमातुन स्वच्छता कामगारांना सक्षम करे त्यांना राज्याच्या महानगरपालिकेमधून सहाय्य करणे हे आहे.
हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजची स्थापना महाराष्ट्र येथील संभाजीनगर येथे ऑगस्ट 2018 मध्ये झाली ज्यामध्ये पाच दिवसीय प्रशिक्षण मोड्यूल ची व्यवस्था आहे. कोविड-19 च्या महामारीपासून, सर्व प्रशिक्षण वर्कशॉप ऍप-आधारित कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हर्च्युअल पद्धतीने चालू आहेत. त्याच्या सुरुवातीपासून, कॉलेज परिवर्तनीय बदल आणण्यावर भर देत आहेत आणि त्यांनी मागील 3 वर्षात 7,700 स्वच्छता कामगारांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
आतापर्यंत प्रशिक्षण दिलेले 100% स्वच्छता कामगार कायस्वरूपी सुरक्षित नोकरीसाठी सक्षम झाले आहेत, काहींनी आतिथ्य विभाग, सिनेमा, ऑटो आणि रूग्णालये यांमध्ये उत्तम स्थान प्राप्त केले आहे. हा उपक्रम स्वच्छता कामगारांना नवीन नोकरीमध्ये सामना करणे, व्यवस्थापन करणे आणि समायोजन करणे यांसाठी मदत करतो.






























































