अकरावी प्रवेशाची तिसरी यादी; कटऑफचा टक्का कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या यादीसाठी अर्ज सादर केलेल्या निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले आहे. दुसऱया गुणवत्ता यादीच्या तुलनेत तिसऱया गुणवत्ता यादीत काॅलेज कटऑफमध्ये फारसा फरक झालेला नाही. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या 1 लाख 10 हजार 461 विद्यार्थ्यांपैकी केवळ 39 हजार 964 विद्यार्थ्यांनाच काॅलेज अलॉट झाले आहे. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत संबंधित काॅलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे.

जयहिंद काॅलेजचा आर्ट्सचा तर रूपारेल काॅलेजच्या काॅमर्सच्या कटऑफमध्ये काहीही फरक झालेला नाही. या दोन्ही काॅलेजचा दुसऱया आणि तिसऱया यादीचा कटऑफ 91 टक्केच राहिला आहे. रूईया काॅलेजच्या आर्ट्सच्या कटऑफमध्ये पॉइंट 2 टक्क्यांची घट झाली आहे. तर झेवियर्सचा आर्ट्सचा कटऑफ 94 वरून 93.2 टक्क्यांवर आला आहे. डहाणूकरचा काॅमर्सचा कटऑफ 90.2 टक्क्यांवरून 90 टक्के झाला आहे. तर झेवियर्सचा सायन्सचा कटऑफ 91 वरून 89.8 टक्क्यांवर आला आहे.

कटऑफ खाली येण्याचा अंदाज चुकला

दुसऱया यादीच्या तुलनेत तिसऱया यादीचा कटऑफ दोन ते तीन टक्क्यांनी खाली येईल असे विद्यार्थ्यांना वाटले होते, पण कटऑफ खाली येण्याचा अंदाज चुकला आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 70 हजार 497 विद्यार्थ्यांचे यादीत नावच आलेले नाही. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या टक्केवारीनुसार नोंदविलेले काॅलेज पसंतीक्रम आणि कटऑफ यात फरक असण्याची शक्यता आहे.

काही काॅलेजांचे कटऑफ

काॅलेज आर्टस् काॅमर्स सायन्स

  • जयहिंद 91.00 % 92.00 % 88.02 %
  • केसी 87.00 % 90.08 % 88.04 %
  • झेवियर्स 93.02 % – 89.08 %
  • रुईया 92.02 % – –
  • रुपारेल 89.00 % 90.04 % 91.00 %