
आपण ट्रफिक जाममध्ये अडकला असाल आणि कानावर विविध वाहनांचे कान किटवणारे आवाज येण्याऐवजी जर अॅम्ब्युलन्सच्या घोंघावणाऱया सायरनऐवजी हार्मोनियमचे सुमधूर सूर ऐकू आले तर… हो लवकरच वाहनांच्या हॉर्नच्या पॅटर्नवर काम सुरू होणार असून हिंदुस्थानी वाद्यांचा सूर त्यातून ऐकू येणार आहे.
वाहनांच्या डोके दुखवणाऱया हॉर्नऐवजी आता हार्मोनियम, तबला आणि शंख यांच्या आवाजाचे हॉर्न ऐकायला मिळणार आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज 90 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून बनणाऱया दिल्ली ते मुंबई ग्रिनफिल्ड एक्स्प्रेस वेची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी हॉन पॅटर्नवर काम सुरू असल्याचे सांगितले.
दिल्ली-मुंबई ग्रिनफिल्ड एक्स्प्रेस वेच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रणथंबोर आणि मुंपुंदरा हिल्स टायगर रिझर्व्हपासून निघणाऱ्या या एक्स्प्रेस वेचा येथील भाग एलिव्हेटेड स्वरूपात असणार असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातील प्राण्यांना कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
1350 कि.मी. लांबीचा एक्स्प्रेस वे…
दिल्ली – मुंबई एक्स्प्रेस वे हा ‘भारतमाला’ योजने अंतर्गत तयार केला जात आहे. याद्वारे दोन मोठय़ा शहरांना जोडले जाईल. हा हायवे 1350 कि.मी. लांबीचा असणार आहे. या मार्गासाठी 90 हजार कोटींचा खर्च येईल. हा प्रोजेक्ट जानेवारी 2023पर्यंत पूर्ण होईल. हा हायवे देशातील दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांतून जाणार आहे.
चांगले रस्ते हवे तर टोल भरावाच लागेल..
चांगली सेवा हवी असेल, चांगले रस्ते हवे असतील तर लोकांना पैसे भरावेच लागतील, असे आपल्या खास शैलीत पेंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या वेळी सांगितले. एसी हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर भाडे द्यावे लागणार. फुकट करायचा असेल तर मैदानात बसूनही लग्न लावता येते, असेही गडकरी यांनी टोलसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. एक्स्प्रेसवरून प्रवास करताना टोलच्या माध्यमातून अधिक पैसे मोजावे लागतात अशा स्वरूपाचा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला होता. एक्सप्रेस वेमुळे प्रवासाचा वेळ मोठय़ा प्रमाणात वाचतो, असेही गडकरी यांनी सांगितले.




























































