सोलापूरात अनिवासी हिंदुस्थानींचे रुग्णालय; धाड पडताच बोगस डॉक्टर पळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहरात एक अनिवासी हिंदुस्थानीने बोगस डॉक्टर ठेवत रुग्णालय थाटल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकताच बोगस डॉक्टर पळून गेला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णमूर्ती पिंडीपोल व बाळासाहेब नंदुरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अनिवासी हिंदुस्थानी पिंडीपोल याचे रविवार पेठेत जय हॉस्पिटल आहे. जय हॉस्पिटल महाराष्ट्र नर्सिंग अॅक्टनुसार नोंदणीकृत असून यात सहा डॉक्टर कार्यरत असल्याची नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात बाळासाहेब नंदुरे हा एकटाच डॉक्टर म्हणून काम पाहतो. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे समजले. दरम्यान, अधिकाऱ्यांना चकवा देत तपासणीदरम्यान त्याने पोबारा केला. याप्रकरणी पालिकेचे कर्मचारी श्रीकांत बोराडे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.