आकाशातून पडणाऱ्या विजेमध्ये किती व्होल्ट आणि करंट असतो?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाशातून पडणाऱ्या विजेमुळे जीवित हानी झालेली आपण नेहमी ऐकतो. त्यामुळे आकाशातून पडणाऱ्या विजेला कैद करण्याची कल्पनाही आपल्या मनात डोकावून जात असेल. पण, हे शक्य नाही.

आकाशातून जमिनीच्या दिशेने झेपावणाऱ्या विजेला बंदिस्त करून तिचा वापर करता येऊ शकत नाही. कारण, तिच्यात प्रचंड प्रमाणात प्रवाह असतो. या विषयी विचारलेल्या प्रश्नाला कोरा या संकेतस्थळावर उत्तर देण्यात आलं आहे.

एका विजेच्या लोळात साधारणतः 300 मिलियन म्हणजेच 300 दशलक्ष वोल्ट आणि 30000 अँप्स् ऊर्जा असते. तुलनेने घरगुती वीजप्रवाह 120 वोल्ट आणि 15 अँप इतका असतो. नेहमीच्या 100 वॅट क्षमतेचा एक फ्लूरोसेंट बल्ब 3 महीने व तसाच छोटा फ्लूरोसेंट बल्ब साधारणतः वर्ष भर चालेल इतकी ऊर्जा एका विजेच्या लोळात असते.

ढगातून जमिनीवर कोसळणार्‍या विजांचे लोळ ही फार सामान्य घटना आहे. दरेक सेकंदास सुमारे 100 अशा विजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळत असतात. पण त्यांची शक्ती मात्र अफाट असते. प्रत्येक विजेच्या लोळात एक अब्ज वोल्ट इतकी विद्युत उर्जा असते.

पडणाऱ्या विजेचा प्रचंड वेग आणि तडाखा तसेच त्यात वहन होत असलेली उर्जा एवढी शक्तीशाली असते की तिला उपयोगासाठी साठवणे अजून शक्य झाले नाही.