शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांच्या अंगात उष्णतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अशा व्यक्तींना कोणत्याही ऋतुमध्ये उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अनेक जणांना या काळात डोळ्यांची आग होणे, छातीत जळजळणे, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा तक्रारी जाणवतात. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कोणते ते घेऊयात.

1. रात्री झोपण्या आधी एरंडेल तेल तळ पायाला चोळावे. डोक्याला मसाज करा. हे तेल थोडे चिकट असते, पण त्यामुळे उष्णता कमी होण्यास नक्की फायदा होतो.

2. उन्हाळ्यात रात्री झोपताना साजुक तुपाचे दोन थेंब नाकात टाकावेत.

3. आहारात ताज्या ताकाचा समावेश असावा.

4. गुलकंद नुसता किंवा दुधात रात्री झोपताना आणि सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

5. भरपूर पाणी प्यावं. तसंच माठातील पाणी पिण्यावर भर द्यावा. शक्यतो फ्रिजमधील गारं पाणी पिण्याचं टाळावं.

6. तुळशीचे बी रात्री भिजवून सकाळी दुधातून घ्यावे.

7. शक्यतो पाणीदार फळांचं सेवन करावं. यात कलिंगड, ताडगोळे, द्राक्ष, डाळींब या फळांचं सेवन करावं.

8. सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून उपाशीपोटी घ्यावा.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना अनिल पाटील यांनी ही माहिती दिली.