पँटची झिप उघडी ठेवून अभिनेत्री आली विमानतळावर, नेटकऱ्यांकडून ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींची फॅशन फॉलो करणारा बराच मोठा प्रेक्षकवर्ग आहे. पण, बऱ्याचदा फॅशन दाखवण्याच्या नादात अनेकदा त्यांची फजिती होत असते.

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री उर्फी जावेद हिची देखील गत काहीशी अशीच झाली आहे. फॅशनिस्टा होण्याच्या नादात भलतंच काहीतरी करणाऱ्या उर्फिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

उर्फी काही दिवसांपूर्वी विमानतळाच्या बाहेर दिसली होती. तिने क्रॉप टॉप आणि पँट परिधान केली होती. कॉटन पजामा स्टाईल पँटची झिप तिने अर्धी उघडीच ठेवली होती. सोबत बटनही तिने लावलं नव्हतं.

तिचा विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. फक्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी असे कपडे घालू नकोस, असा सल्लाही नेटकऱ्यांनी तिला दिला आहे.