
2023 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. राज्याची निवडणूक पंतप्रधान मोदींच्या भरवशावर नाही जिंकता येणार असे मत माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केले आहे. तसेच प्रादेशिक नेत्यांनी मैदानात उतरून चांगली कामगिरी केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटकातील दावणगेरेमध्ये पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
येडियुरप्पा म्हणाले की, “मोदी लाटेवर आपण विधानसभा निवडणूक नाही जिंकू शकत. आपल्याला विधानसभेसाठी सर्वांनी मिळून मेहनत घेतली पाहिजे. केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी मिळून 140 हून जागा जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा विधानसभा निवडणूकीच्या वेळी राज्यातील नेत्यांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे असे येडियुरप्पा म्हणाले.
काँग्रेसचा आपल्या आमदारांवर डोळा
काँग्रेसचा भाजपच्या आमदारांवर डोळा असल्याचे येडियुरप्पा म्हणाले. “काही नेते मला भेटले आणि आपल्या आमदारांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकात 2023 मध्ये निवडणूक आहे. त्यापूर्वी काँग्रेस आपल्या आमदारांना संपर्क करण्याच प्रयत्न करेल.’’ परंतु आपले आमदार भाजपमध्ये सामील होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




























































