सिमकार्ड अपग्रेड करणे पडले महागात, 50 हजार केले लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाइल सीमकार्डची माहिती अपग्रेड करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एकाच्या बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने 50 हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कर्वेनगर भागातील नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारादाराच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संपर्क साधून मोबाइल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. त्यानंतर सीमकार्डची माहिती अपग्रेड करण्याचे काम सुरू असून माहिती न दिल्यास सीमकार्ड बंद पडेल, अशी बतावणी चोरट्याने केली. टीमव्ह्यूअर क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून चोरट्याने तक्रारदाराच्या बँक खात्यातून 49 हजार 950 रुपये लांबविले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अमृत मराठे तपास करत आहेत.