
‘नाळ’ या चित्रपटातील दमदार अभिनयामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला बालकलाकार श्रीनिवास पोकळे आता ‘निबंध’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजीव मोरे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱया या चित्रपटात शीर्षकाला अनुसरून शालेय जीवनावर आधारित कथानक पाहायला मिळणार आहे.
शाळेत शिकणाऱया तीन विद्यार्थ्यांच्या अतूट मैत्रीची कथा सांगणारा ‘निबंध’ हा चित्रपट आजच्या काळातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. मा अनसूया फिल्म्स एलएलपी निर्मित आणि हेमंत नागपुरे प्रस्तुत या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व अनिल वी. कुमार यांच्या हस्ते गोरेगाव येथील चित्रनगरीमध्ये संपन्न झाला. या चित्रपटाचे शूटिंग गडचिरोली जिल्ह्यात होणार आहे.




























































