
जुन्या वादातून टोळक्याने तरूणावर वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना काल संध्याकाळी सहाच्या सुमारास सातारा रस्त्यावर बालाजीनगरमध्ये घडली. आतिश शिवाजी कांबळे (वय 27, रा. तळजाई वसाहत )असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याची आई कलावती कांबळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी कलावती यांचा मुलगा बालाजीनगर परिसरात सायकल दुरूस्तीचे काम करतो. काही दिवसांपुर्वी त्याची एकासोबत भांडणे झाली होती. त्याच रागातून संबंधिताने साथीदारांना बोलावून आतिशच्या डोक्यात आणि हातावर वार करून गंभीररित्या जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे तपास करीत आहेत.































































