साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार चोख तपास करा! उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांचे पोलिसांना निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील पीडिता प्रकरणाचा साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार चोख तपास करावा आणि त्या पीडितेला संरक्षण देऊन तिच्या योग्य पुनर्वसनाची व्यवस्था करावी, असे स्पष्ट निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी संबंधित अधिकारी व पोलिसांना दिले.

डॉ. नीलम गोऱहे यांनी ठाणे झोन 3 चे पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेत त्यांना योग्य त्या सूचना केल्या. डोंबिवलीतील घटनेत षडयंत्र रचून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला इतरांनी घेरले. त्यांच्या ब्लॅकमेलिंगच्या कटकारस्थानाला ती मुलगी दुर्दैवाने फशी पडली आहे, असे सांगून या घटनेचे कुणी राजकारण करू नये, असेही डॉ. गोऱहे यांनी स्पष्ट केले.

बोरिवलीच्या पीडितेवर दबाव आणणाऱयांना शिक्षा करा

बोरिवलीतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात झालेल्या महिलेच्या विनयभंग प्रकरणाचीही माहिती डॉ. नीलम गोऱहे यांनी झोन 2 चे अधिकारी विशाल ठाकूर यांच्याकडून घेतली. या घटनेतील पीडितेने पुढे येऊन तिच्यावरील अन्यायाला वाचा पह्डली आहे. जे कोणी पीडितेला धमकी देऊन त्रास देत असतील त्यांच्यावर तत्काळ प्रतिबंधक कारवाई करा. या पीडितेचा 164 अन्वये जबाब घ्या आणि दबाव आणणाऱयांना शिक्षा करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.