
यूएई व ओमान येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणाऱया टी-20 वर्ल्ड कपचा बिगुल दणक्यात वाजला आहे. आयसीसीकडून गुरुवारी या स्पर्धेसाठी ‘थीम साँग’चे अनावरण करण्यात आले. हिंदुस्थानी संगीतकार अमित त्रिवेदी यांच्याकडून ऑनिमेटेड फिल्म्सची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली, वेस्ट इंडीजचा कायरॉन पोलार्ड, अफगाणिस्तानचा राशीद खान व ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल ऑनिमेटेड अवतारात दिसत आहे. या अँथेम साँगला जगभरातून दणदणीत प्रतिसादही मिळत आहे.



























































