
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना कडाडून मिठी मारली. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. फडणवीस आणि मी आम्ही दोघेही मित्र आहोत. मित्र मित्राला मिठी मारणार नाही तर कुणाला मिठी मारणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघं मित्र आहोत. हे जगजाहीर आहे. तेही सर्वांना सांगतात, मीही सांगत असतो. मित्राला मित्र मिठी मारत नाही तर काय दुश्मनाला मारतात? असा सवाल पटोले यांनी केला. या मिठीचा राजकीय अर्थ काही होऊ शकत नाही. भाजप काँग्रेस दोन तट आहेत. कधीही एकत्र येऊ शकत नाही. दोन्ही पक्षांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नाही. फक्त देशहितासाठीच एकत्र येऊ शकतात, असे पटोले म्हणाले.






























































