
खार परिसरात घरफोडय़ा करणाऱया तिघांना खार पोलिसांनी अटक केली. धीरजकुमार कश्यप, संतोष भोईर ऊर्फ खजवा आणि अब्दुल अन्सारी अशी त्या तिघांची नावे आहेत. ते तिघे नालासोपारा येथील रहिवासी असून नशेसाठी घरफोडय़ा करण्यासाठी ते खार परिसरात येत असायचे.
खार परिसरात हॉटेल, गॅरेज, मेडिकल शॉप आणि डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये दिवसाढवळ्या घरफोडय़ा झाल्या होत्या. वाढत्या घरफोडय़ा पाहता आरोपीच्या अटकेसाठी खार पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. वरिष्ठ निरीक्षक गजानन काबदुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे आणि पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी खार-वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजवरून पोलिसांनी धीरजकुमार आणि संतोषला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी हॉटेल, आणि एका डॉक्टरच्या क्लिनिकमधून लॅपटॉप, टॅब, म्युझिक सिस्टीम चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. धीरजकुमार आणि संतोष हे दोघे न नशा करून दिवसाढवळ्या चोऱया करतात. चोरीचा माल ते एकाला विकण्यापूर्वी त्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले. धीरजकुमार आणि संतोष हे दोघे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
























































