
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथे नरबळी करण्याचे कटकारस्थान सुरू असल्याची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून 2 जणांना अटक केली. सिमा पिंपळे (रा. डोणगाव) यांनी 23 सप्टेंबरला तिचा पती संतोष पिंपळे,गावातील जिवन पिंपळे, व एक अनोळखी महिला असे गुप्तधनाच्या लोभापोटी नरबळीचा कट आखत असल्याचे करण्याचे तयारीत असल्याबाबत तक्रार दिली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून नरबळीसारखा प्रकार घडू नये म्हणुन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे रविंद्र यकरे यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. तसेच या कटातील दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. आरोपींची पोलीस कोठडी घेत त्यांची चौकशी केली. गुन्हयात आरोपींना मदत करणारी मांत्रिक महिला हिचा देऊळगाव राजा (जिल्हा बुलडाणा) हद्दीतील उंबरखेड येथे शोध घेत तिला अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पोलीस ठाणे टेंभुणी येथे आरोपींविरुध्द महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कलम 3 (1) सह कलम 2 (1) (ख), 4 सह कलम 323,504 ,506 ,34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहपोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे करीत आहेत. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागोय पोलीस अधिकारी इंदल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभूणीं पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक दिंडे,पोलीस स्टॉफचे किरण निर्मळ, पंडीत गवळी,गणेश पवार,गजेंद्र भुतेकर, महिला पोलीस छाया निकम, सागर शिवरकर यांनी केली.




























































