
मुंबई पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक बनवण्यासाठी पालिका अनेक उपक्रम राबवत असून आता दहिसर, ओशिवरा-वालभाट नद्या पुन्हा स्वच्छ-सुंदर, प्रवाही होणार आहेत. या नद्यांमध्ये जाणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून नदीच्या दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड तयार केले जाणार आहेत. या कामांसाठी पालिका एक हजार कोटींवर खर्च करणार आहे.
दहिसर नदी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावून 4.7 किलोमीटरचा प्रवास करून मनोरी खाडीत मिळते. श्रीकृष्ण नगर, आंबेवाडी येथील तबेल्यातील पाणी थेट नदीत सोडले जाते. तसेच नागरी वसाहतींसह धोबीघाटातील दूषित पाणीही नदीत सोडले जाते, तर ओशिवरा नदी गोरेगाव येथील आरे वसाहतीतील टेकडीत उगम पावून 7.31 किलोमीटरचा प्रवास करून ही नदी मालाड खाडीत विसर्जित होते. साधारण 2 हजार 474 हेक्टरचे पाणलोट क्षेत्र असून संतोषनगर, रिद्धी-सिद्धी, बिंबीसार नगर, नंदादीप, नेक्सो, मजासनगर, ज्ञानेश्वर नगर असे अनेक नाले या नदीला येऊन मिळतात. नद्यांच्या काठावरील वसाहती, झोपडपट्टय़ा व सोसायटय़ांमधील सांडपाणी, नाल्याचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. शिवाय कचरा, शौचालयाचे पाणी सोडले जात असल्याने नद्यांना बकाल स्वरूप येते. त्यामुळे या नद्यांना गतवैभव मिळवून देण्यासाठी पालिका काम करीत आहे. या कामासाठी पालिका एक हजार कोटींवर प्रकल्प खर्च करणार असून एकूण खर्च सुमारे तेराशे कोटींवर केला जाणार आहे. या दोन्ही नदींच्या पुनरुज्जीवनाचे प्रस्ताव आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत.
असे होणार दहिसर नदीचे काम
दहिसर नदीसाठी मलवाहिन्यांचे बांधकाम – 4.4 किलोमीटर, पोहोच रस्ते – 1.06 किलोमीटर, पर्जन्यवाहिन्यांचे बांधकाम – 1.02 किलोमीटर
नाला इंटरसेप्टर – 10 ठिकाणी, मलजल प्रक्रिया पेंद्र – दोन ठिकाणी मिळून 6.5 दशलक्ष लिटर प्रतिवर्ष
अंदाजित खर्च – 232 कोटी 71 लाख 34 हजार ८४१
प्रत्यक्ष प्रकल्पासाठी होणारा खर्च – 281 कोटी 15 लाख 69 हजार 332
असे होणार ओशिवरा नदीचे काम
- अंदाजित खर्च – 637 कोटी 21 लाख 73 हजार 183
- प्रत्यक्ष प्रकल्पासाठी होणारा खर्च – 631 कोटी 41 लाख 97 हजार 499
- ओशिवरा-वालभाट नदीसाठी मलवाहिन्यांचे बांधकाम – 4.7 किमी, पोहोच रस्ते – 4.68 किमी, पर्जन्यवाहिन्यांचे
बांधकाम – 5.10 किमी, नाला इंटरसेप्टर – 6 ठिकाणी - संरक्षक भिंतीचे बांधकाम – 1.79 किमी, मलजल प्रक्रिया केंद्र – पाच ठिकाणी मिळून 20.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
मुंबई, दि. 27 (प्रतिनिधी) – मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्र परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र 5 च्या परीक्षा 17 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान होतील. या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (MCQ) पद्धतीने ऑनलाईन होणार आहेत.
बीए (एमएमसी), बीएमएस, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट ), बीकॉम (बॅंकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट अँड मॅनेजमेंट), बीकॉम (फायनान्स अँड मार्पेटिंग), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बीएस्सी ( बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बीएस्सी (आयटी), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडीज), बीएस्सी (एव्हीएशन) व बीएस्सी (एरोनॉटिक्स) या पदवीच्या 5व्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल तसेच या परीक्षेसाठी प्रश्नपेढी विद्यापीठ पाठविणार आहे.
तसेच पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदवीच्या सत्र 6 च्या बॅकलॉगच्या परीक्षा 7 ते 20 डिसेंबर दरम्यान होतील. तर पारंपरिक कला, वाणिज्य व विज्ञान पदव्युत्तर सत्र 2 व 4 च्या बॅकलॉगच्या परीक्षा 1 ते 15 डिसेंबर दरम्यान होतील.






























































