
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या ‘फाइंडिंग अनामिका’ या पहिल्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. माधुरीने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर केला आहे. वेबसीरिजचे दिग्दर्शन करिश्मा कोहली आणि बिजॉय नांबियार यांचे असून निर्मिती करण जोहरची आहे. ही गोष्ट आहे, एका सुपरस्टार पत्नी आणि आईबद्दल, जी अचानक बेपत्ता होते. पोलिसांसह तिचा चाहतावर्ग अनामिकाच्या बेपत्ता होण्याचे उत्तर शोधत असतो. यामध्ये संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे आणि मुस्कान जाफरी यांच्यादेखील भूमिका आहेत.





























































