गोव्यात युतीची गरज नाही, पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-saheb-new

उत्तर प्रदेशसह गोव्यातही निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. गोव्यातील निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. इथे 22 जागांवर शिवसेना लढणार असून आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे चांगली कामगिरी करून दाखवू, असा विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला.

शिवसेना नेते संजय राऊत गोवा दौऱयावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील पक्षबांधणीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर गोवा महाराष्ट्राच्या शेजारीच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता. शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे. विजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट घेणार आहे. नवे आणि जुने पक्ष कार्यकर्ते या दौऱयात मला भेटणार आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करू.