
मालवण येथील दांडी चर्च समोर मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली.
स्थानिक नागरिक व मच्छिमार यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले मात्र गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेली मासेमारी जाळी, बॅरल व अन्य मासेमारी साहित्य तसेच गोडाऊन छप्पर जळून सुमारे 4 ते 5 लाखाचे नुकसान झाले आहे. अशी माहिती बाबाला पिंटो यांनी दिली.
बंद गोडाऊनला शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मालवण नगरपालिकेला देण्यात आली. पालिका कर्मचारी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्नांनी पाणी व अन्य आग विझवण्याच्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधीनीही त्या ठिकाणी धाव घेतली होती.
मासेमारी जाळ्यांचे मोठे नुकसान
गोडाऊन मध्ये मासेमारी जाळी ठेवण्यात आली होती. आग लागल्यानंतर या जाळ्यानी पेट घेतला. आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे लोट दूरवर दिसून येत होते.






























































